Baby Birth Muhurta
तुमच्या घरात येणाऱ्या लहानग्या पाहुण्याचे स्वागत एका अत्यंत शुभ आणि भाग्यवान क्षणाने व्हावे यासाठी ही विशेष सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. श्री क्षेत्र नाशिक त्र्यंबकेश्वर येथील वंदनचे अनुभवी गुरुजी, तुमच्या डॉक्टरांनी दिलेल्या संभाव्य तारखांचा सखोल अभ्यास करून बाळाच्या जन्मासाठी सर्वात श्रेष्ठ मुहूर्त निश्चित करतील. आपल्या शास्त्रात जन्माच्या वेळेला अनन्यसाधारण महत्त्व आहे, ज्यामुळे बाळाला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि उज्ज्वल भविष्य लाभण्यास मदत होते.
या प्रक्रियेत सर्वप्रथम आपल्याकडून डिलव्हरीचा संभाव्य आठवडा जाणून घेतला जाईल, त्यानंतर पंचांगाचा अभ्यास करून आपल्याला त्या आठवड्यातील सर्वोत्तम मुहूर्त वेळेसोबत पाठवले जातील. त्यामध्ये काही शंका असतील तर आपण नक्की विचारू शकता. हि सर्व प्रक्रिया पूर्ण व्हायला १-२ दिवस लागतील.