Skip to product information
शास्त्रोक्त वाण-दान विधी

⭐ ⭐ ⭐ ⭐ ⭐ 4.8/5

शास्त्रोक्त वाण-दान विधी

Rs. 299.00
Sale price  Rs. 299.00 Regular price  Rs. 1,501.00

जावई म्हणजे साक्षात विष्णू: केवळ वाण नको, शास्त्रोक्त संकल्पासह वाण द्या. घरबसल्या मिळवा गुरुजींचे व्हिडिओ मार्गदर्शन!

विष्णुपूजेचे पुण्य

अडचणींवर मात

सुख-समृद्धी

शास्त्रोक्त मार्गदर्शन

सोयीच्या वेळेनुसार

माफक दरात

घरबसल्या पूजा

गुरुजींशी बोलायचे आहे?

लगेचच आमच्या अनुभवी गुरुजींशी बोला

Talk now!

Product Description

परंपरेचे पावित्र्य, आता तुमच्या सोयीनुसार!
महाराष्ट्रीयन संस्कृतीत जावयाला 'विष्णू स्वरूप' मानले जाते. लेक-जावयाचा सन्मान करणे किंवा भाचा-भाचीला वाण देणे, ही केवळ एक परंपरा नसून तो कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक सोहळा आहे. अनेकदा विधी कसा करावा किंवा नेमका संकल्प काय असावा, याबद्दल साशंकता असते. म्हणूनच 'वंदन' घेऊन येत आहे, तज्ज्ञ गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली घरबसल्या पूर्ण करता येणारा 'शास्त्रोक्त वाण-दान विधी'.

थोडक्यात माहिती
हे १५ मिनिटांचे एक विशेष ऑनलाईन सत्र आहे. यामध्ये अनुभवी पंडितजी व्हिडिओ द्वारे तुम्हाला वाण देण्याचा योग्य विधी, त्यामागील शास्त्र, संकल्प आणि मंत्र समजावून सांगतील. धावपळीच्या जगात आपल्या संस्कृतीचे जतन करण्याचा हा एक आधुनिक आणि सुलभ मार्ग आहे.

उद्देश
शास्त्रशुद्ध संकल्प: शास्त्रात वाण-दानाला खूप महत्त्व आहे, पण ते योग्य संकल्पाशिवाय पूर्ण होत नाही. हा विधी केल्याने तुम्हाला दानाचे संपूर्ण फळ आणि समाधान मिळते.
वेळेची बचत: गुरुजींना प्रत्यक्ष घरी बोलावण्याची धावपळ आता टाळता येईल.
लवचिकता (Flexibility): तुमच्या सोयीनुसार दिवस आणि वेळ निवडून तुम्ही हा विधी पूर्ण करू शकता.

Samagri List

आवश्यक साहित्य (Essentials/Samagri)

विधीसाठी खालील साहित्य सोबत ठेवा:
- तांब्या, पळी, पंचपात्र (पाणी).
- अक्षता, हळद-कुंकू, अष्टगंध.
- वाण: (उदा. ३३ अनरसे, फळे, किंवा इतर भेटवस्तू).
- ताट (वाण ठेवण्यासाठी) आणि रुमाल (वाण झाकून ठेवण्यासाठी).
- निरंजन (तुपाचा दिवा).

FAQs

प्रश्न: हा विधी फक्त जावयासाठीच आहे का?
उत्तर: नाही, हा विधी तुम्ही जावई, मुलगी तसेच भाचा-भाची यांना वाण देण्यासाठी करू शकता.

प्रश्न: व्हिडिओ कॉलसाठी काही विशेष ॲप लागेल का? (फक्त Live पूजेसाठी)
उत्तर: आम्ही सामान्यतः Google Meet चा वापर करतो, ज्यासाठी वेगळ्या कोणत्याही कठीण सेटिंग्सची गरज नाही.

प्रश्न: जर काही कारणास्तव मी बुक केलेला स्लॉट चुकला तर? (फक्त Live पूजेसाठी)
उत्तर: कृपया विधीच्या २ तास आधी आम्हाला कळवा, आम्ही तुमचा स्लॉट रि-शेड्युल (Re-schedule) करण्यास मदत करू.

You may also like

शास्त्रोक्त वाण-दान विधी

Rs. 299.00